फार्मर युनिक आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अॅग्री स्टॅक आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र दुरुस्त कस करायचं

मित्रांनो फार्मर युनिक आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र Agri Stack अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांचे या पोर्टलवरती नोंदणी सुरू आहे आणि याच पोर्टलवरती नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या पोर्टलवरती दिलेला आपला मोबाईल नंबर कसा बदलायचा, नोंदणी  करत असताना एकच गट ऍड केला जमीन दुसरी ऍड केली नाही किंवा दुसऱ्या जमिनीचे गट याच्यावरती ऍड करायचे होते ऍड केलेल्या गटामध्ये काही दुरुस्ती होती अशा प्रकारचे बरेच सारे प्रश्न प्रश्न होते परंतु याच्यावरती दुरुस्ती सुरू करण्यात आलेली नव्हती आणि अखेर या पोर्टलवरती आता शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल नंबर बदलण्यासाठी त्याच्यामध्ये नवीन गट ऍड करण्यासाठी ही दुरुस्ती सुरू करण्यात आलेली आहे.

आणि आजच्या या लेखातून हीच दुरुस्ती कशी करायची हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वीच आपण शेतकऱ्यांना स्वतःच्या माध्यमातून नोंदणी कशाप्रकारे करायची सीएससीच्या माध्यमातून नोंदणी कशी करायची हे कार्ड आपलं पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड कस करायच याच्या बद्दल वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती घेत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या दुरुस्ती बद्दल विचारणा केली जात होती. मित्रांनो दुरुस्ती करण्यासाठीचे ऑप्शन आता अखेर याच्यावरती ऍड करण्यात आलेले आहे. याच्यासाठी आपल्याला आपण ज्या पोर्टलवरती नोंदणी केली त्याच agristack पोर्टलवरती यायचे आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस लॉगिन विथ सीएससी अशा प्रकारचे विविध ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत आणि याच्याच खाली आपण पाहू शकता फार्मर लॉगिन साठी ऑप्शन आहे याच्यात फार्मर वरती क्लिक करून आपण आपल्या मोबाईल नंबर ओटी ओटीपी किंवा मोबाईल नंबर पासवर्ड नुसार याच्यामध्ये लॉगिन करू शकतो मोबाईल आणि ओटीपीन लॉगिन करणं सोप आहे. मोबाईल नंबर टाकायचा एक ओटीपी येईल ओटीपी टाकायचा आहे खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून याच्यामध्ये आपल्याला लॉगिन वरती क्लिक करायच लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपला जो काही डॅशबोर्ड असेल तो खुलेल याच्यामध्ये आपल्याला होम मध्ये आपली जी काही माहिती आपण भरलेली आहे ती आपली केवायसी ची माहिती या ठिकाणी समोर दाखवली जाणार आहे ज्याच्यामध्ये आपलं नाव पत्ता वय वगैरे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जात आहे आता याच्यामध्ये आपण पाहू शकता दुसरी ऑप्शन आपल्याला दाखवलेली चेक एनरोलमेंट स्टेटस अर्थात आपल्या नोंदणीची सध्याची स्थिती काय रजिस्ट्रेशनची सध्या स्थिती काय पेंडिंग आहे अप्रूड आहे त्याच्यामध्ये आपला जर एनरोलमेंट आयडी आलेला असेल किंवा सेंट्रल आयडी आले असेल तर आपल्याला दाखवला जाईल.

आता याच्यामध्ये महत्त्वाची अशी ऑप्शन आहे ते म्हणजे माय इन्फॉर्मेशन अर्थात आपण जी काही माहिती भरलेली ती माहिती आपल्याला संपूर्ण या ठिकाणी दाखवली जाते आता माहिती या ठिकाणी दाखवली जाते माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये एक पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करण्याची सुद्धा ऑप्शन लवकरच ऍड होणार आहे सध्या त्याच्यामध्ये डाउनलोड पीडीएफ आपण करू शकत नाही आणि याच ठिकाणी अन्नदाता कार्ड सुद्धा आपण डाऊनलोड करू शकणार आहात त्याचे ऑप्शन सुद्धा लवकरच या ठिकाणी एनेबल होणार आहे.  आपल्याला याठिकाणी ऑप्शन आहे अपडेट माय इन्फॉर्मेशन च या अपडेट माय इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपला केवायसी च डिटेल मध्ये मोबाईल नंबर चेंज करू शकतो जुना जो मोबाईल नंबर असेल तो जुना मोबाईल नंबर व्हेरिफाय करायचा अर्थात त्याच्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून आपल्याला व्हेरिफाय करायच नवीन जो नंबर द्यायचा तो नवीन नंबर टाकून सुद्धा त्याच्यावरती सुद्धा एक ओटीपी पाठवला जाणार आहे आणि तो ओटीपी सुद्धा आपल्याला व्हेरिफाय करावा लागणार आहे दोन्ही नंबरचे ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतरच आपण याच्यामध्ये नवीन नंबर समाविष्ट करू शकता आता याच्यामध्ये मोबाईल नंबर समाविष्ट करण्याबरोबरच लँडच्या डिटेल आहे. जमिनीच्या डिटेल त्या सुद्धा याच्यामध्ये आपण नवीन गट ऍड करण असेल किंवा जो गट दिलेला आहे त्याची दुरुस्ती करण असेल अशा प्रकारच्या दुरुस्ती सुद्धा याच्यामध्ये करता येणार आहेत याच्यामध्ये आपण पाहू शकता जे काही आपली जमिनीची माहिती आहे ती जमिनीची माहिती न्यू लँड म्हणून आहे तर त्याच्यामध्ये नवीन जमीन जर ऍड करायची असेल तर आपण याच्यामध्ये जिल्हा तालुका आणि गाव अशा प्रकारे माहिती जोडून याच्यामध्ये नवीन जमिनीची सुद्धा माहिती जोडू शकतो आणि लवकरच याच्यामध्ये आता सध्या दुरुस्तीसाठी चालू आहे अपडेट लँड ओनरशिप अँड लँड डिटेल जे आहेत याच्यामध्ये जर काही दुरुस्ती झालेली असेल ते खालची ऑप्शन सुद्धा आपल्याला वापरता येणार आहे सध्या पोर्टलवरती अपडेट होण्याच काम चालू आहे. परंतु याच्यामध्ये नवीन जमीन ऍड करणं आणि जमिनीची माहिती दुरुस्ती करणं या दोन्ही ऑप्शन आपल्याला या अपडेट माय इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत करता येणार आहेत. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला केवायसी डिटेल काही चेंज करायची असेल ते सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये दाखवली जात आहे. आता याच्यामध्ये आपण जर काही आपली इन्फॉर्मेशन अपडेट केली तर त्याच्याबद्दल आपली जी काही अपडेटची रिक्वेस्ट असेल ती कशा पद्धतीमध्ये काय आहे कुठल्या स्थितीमध्ये ते सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने या अपडेट रिक्वेस्ट स्टेटस वरती क्लिक करून पाहू शकतो याच्यानंतर परत फार्मर ऑथरायझेशन एक नावाचे ऑप्शन आहे याच्याबद्दल आणखीन काही एवढ्या माहिती नाही इथं त्याच्याबद्दलही आपण माहिती मिळाल्यानंतर डिटेल घेऊ आणि शेतकऱ्याची जी वरती माहिती दाखवली जाते याच्यामध्ये सुद्धा अपडेट माय मोबाईल नंबर अशा प्रकारचे ऑप्शन दिलेली आहे या ठिकाणी आपण मोबाईल नंबर चेंज करू शकतो अशा प्रकारचे बदल अशा प्रकारची दुरुस्ती किंवा अशा प्रकारचे ऑप्शन आता आपण या पोर्टलवरती शेतकऱ्याच्या लॉगिनच्या अंतर्गत वापरू शकता आता याच्यामध्ये आणखीन काम सुरू आहे लवकरच हे पोर्टल अद्यावत होईल शेतकऱ्यांना याच्यावरती अन्नदाता कार्ड असेल किंवा याच्यावरती असणाऱ्या दुरुस्त्या असतील या या आता सुलभ रीतीने करता येणार आहेत. तर मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा हा एक महत्त्वाचा असा प्रश्न होता याचीच माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सह

Leave a Comment